Home अहमदनगर तरुणीचा पाठलाग व विनयभंग, तिघांवर गुन्हा

तरुणीचा पाठलाग व विनयभंग, तिघांवर गुन्हा

Rahata Chase and molestation of a young woman

Ahmednagar News Live| Rahata | राहाता: साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून त्रास देत तसेच मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटींग करत धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग (molestation of a young woman) केल्याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अत्याचारित तरुणीने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हंटले आहे की,  एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने माझा नंबर नातलगाकडून घेतला. त्यानंतर मोबाईलवर, व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषण व चॅटींग करत होता. त्यास नाकारले तेव्हा त्याने हाताला दुखापत करून माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवले.

भीतीपोटी मी घरात सांगितले नाही. त्यानंतर कॉलेजला जात असताना तिघांनी एका चारचाकी गाडीत पाठलाग करत ऋषिकेश गायकवाड जवळीक साधत होता. त्याला जोडीदार मंगेश धिवर व अंकुश वानखेडे साथ देत होते. त्यामुळे त्यादिवशी कोणालाही न सांगता रागाने निघून गेले होते. राहाता पोलीस ठाण्यात मिसींग दाखल असल्याचे समजल्यानंतर पाहुण्यांच्या येथून घरी आले. घरच्यांना तिघे त्रास देत असल्याचे सांगितले.

एक वर्षापासून 14 जानेवारी 2022 पर्यंत ऋषिकेश त्याच्या जोडीदारासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या पाठलाग करून त्रास देत आहेत. मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटींग करत धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करत असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे  यांच्यावर भादंवी कलम 354 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक  तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Rahata Chase and molestation of a young woman, crime against three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here