Home अहमदनगर मागील वादातून तलवारीने भीषण हल्ला, दोन जण गंभीर

मागील वादातून तलवारीने भीषण हल्ला, दोन जण गंभीर

Shrirampur fierce attack with a sword from a previous argument

Shrirampur | श्रीरामपूर :   श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती याठिकाणी पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन औरंगाबाद येथून त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी येऊन लाठ्या-काठ्या कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे पिंपळे कुटुंबियांकडून आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान पूर्वीच्या वादामधून वडाळा महादेव येथील बबन कमलाकर पिंपळे यांना औरंगाबाद येथील नातेवाईकांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपळे यांच्या वस्तीवर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना औरंगाबाद येथून एमएच 20- डिव्ही 7330 व एमएच 12 एचव्ही 9242 या वाहनांमधून अंदाजे 24 ते 25 व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यकमासाठी उपस्थित असलेल्या महिला पुरुष तसेच लहान मुले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

सदर व्यक्तींनी लाठ्या-काठ्या, कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून पिंपळे वस्ती येथील अनिल बबन पिंपळे तसेच राजु गंगाधर चव्हाण या व्यक्तींना शस्त्राचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तींनी येथील महिलांनाही बेदम मारहाण केली. यातील दोन व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Shrirampur fierce attack with a sword from a previous argument

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here