Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेऊन बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सुधीर संपत मोकळ वय २१ रा. पारेगाव खुर्द याच्याविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी दिनांक ५ दिसेमार रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौचास जाते असे सांगून घरातून बाहेर गेली ती पुन्हा घरी परतली नव्हती. कुणीतरी आपल्या मुलीस पळवून नेल्याच्या आईच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलीने तिच्या आई व मामा समवेत येऊन  सुधीर संपत मोकळ वय २१ रा. पारेगाव याने आपणांस तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी जीव देईन अशी आईच्या मोबाईलवर धमकी देत पळवून नेत दिनांक ५ ते १५ डिसेंबर २०१९ या काळात बळजबरीने अत्याचार केल्याचा जवाब पोलिसांना दिला.

आरोपी मोकळ याने सदर मुलीस ठाणे येथील त्याच्या खोलीवर नेऊन तसेच कोपरगाव येथे मित्राच्या मेव्हनाच्या घरी नेऊन स्वतःच्या हातावर चाकूने मारून घेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पिडीत मुलीने नोंदविला. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Website Title: Latest News abusing minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here