चिमुरड्यांच्या खाद्य पदार्थ व भाजीपाला विक्रीतुन ५० हजाराहून अधिक रुपयांची उलाढाल
अकोले,दि.१७(प्रतिनिधी): बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आनंदी शिक्षण मिळवून जीवनात जगण्याचा व व्यवहारज्ञान मिळते असे मत जिल्हा परिषद व शिक्षण समिती चे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी जिल्हा परिषद गटातील बालआनंद मेळावा उत्सहात संपन्न झाला. या बालमेळाव्यात शाळकरी बाल चिमुरडे हरकुन गेले होते. चिमुरड्यांनी थाटलेली खाद्य पदार्थ दुकाने व भाजीपाला विक्री बाजारातून सुमारे ५० हजाराहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
यामेळाव्याचे जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. अकोले बीटातर्गत अकोले सह, रुंभोडी, नवलेवाडी आणि कळस या चार केंद्रातील ३४ शाळांतील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. दरम्यान सकाळी गावातून लक्षवेधी दिंडी काढण्यात आली. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध लक्षवेधी पथके तयार करून सादरीकरण करत ग्रामस्थ व पालकांचे लक्ष वेधले. नवलेवाडी शाळेचा विद्यार्थी छत्रपती विश्वास आरोटे या चिमुरड्याने प्रत्यक्ष अश्वासोबत सादर केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा व मावळे हे पथक तसेच कळस बु।। व धामणगांव आवारी येथील लेझीम व ढोल पथक व इतर शाळांतील विविध पथकांनी रंगत आणली. यावेळी विद्यार्थ्यांनी थाटलेल्या विविध खाद्य दालनांसह भाजीबाजारास नागरिकांनी,पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चिमुरड्यांच्या दुकानातून खरेदी करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सुमन खतोडे, मनीषा वाकचौरे, महादेव आहेर,मोहिनी चौधरी यांनी आयोजित केलेला “चालता बोलता” हा कार्यक्रमही लक्षवेधी ठरला. चित्रकला, भित्तिचित्रे, रांगोळी यातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या बक्षीसे विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य जालिंदर वाकचौरे, उपसभापती मारुती मेंगाळ,माजी सदस्य आप्पासाहेब आवारी,भाजप चे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, सरपंच किसन आवारी,माजी सरपंच राधाकिसन पोखरकर, बाळासाहेब आवारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश आवारी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव पापळ, उपाध्यक्ष देवदत्त नवले, ग्रा.प.सदस्य विजय आवारी, अशोक आवारी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष सुशांत वाकचौरे, नामदेव निसाळ, इंदोरी चे सरपंच विकास देशमुख, विवेक देशमुख, प्रवीण देशमुख, सुनील देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची दाद मिळविली. त्यात घोरपडवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य उपस्थितांची प्रचंड दाद मिळवून गेले. तर नवलेवाडी शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी अनिल मंडलिक हिने विस्ताराधिकारी जालिंदर खताळ या अधिकाऱ्यांची घेतलेली थेट मुलाखत लक्षवेधी ठरली. या बाल आनंद मेळाव्यात लकी ड्रॉ उपक्रम सर्वात लक्षवेधी ठरला. सुभाष खरबस यांनी याचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्ताराधिकारी जालिंदर खताळ यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कासार व स्वाती अडाणे यांनी तर रमेश खरबस यांनी आभार मानले. दरम्यान या मेळाव्यास जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,मराठी पत्रकार संघाचे राज्यसरचिटणीस विश्वास आरोटे, उपसंपादक अमोल वैद्य, बाळासाहेब भोर, हरिभाऊ आवारी, सचिन आवारी आदींनी भेटी दिल्या.
Website Title: Latest News sale of food items and vegetables
















































