Home अकोले अकोले: मी राष्ट्रवादी मध्येच नाव न घेता टीका करत सोडली पिचड यांची...

अकोले: मी राष्ट्रवादी मध्येच नाव न घेता टीका करत सोडली पिचड यांची साथ

अकोले: जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निष्ठावंत मानले जाणारे नेते आणि अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी आज पिचड यांच्यावर नाव न घेता टीका करीत “आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहोत” हे स्पष्ट केले. पिचड यांना हा मोठा धक्का असून ते एकाकी पडत असल्याची चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक सहकारी पिचड यांची साथ सोडणार अशी चर्चा होती. त्यात पांडे यांच्या नावाचेही चर्चा होती. पांडे यांनी काल सायंकाळी पत्रकारपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट करीत हि चर्चा खरी असल्याचे सिद्ध केले.

पक्षांतराचा निर्णय जनतेला मान्य झाला नाही. पराभवाने जुने निष्ठावान कार्यकर्ते यांच्याशी संवाद नाही. पराभवाची कारणे शोधणे आणि मतदाराचे आभार मानाने सोडा. उलट कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. आम्हाला व तालुक्याला भाजपाची विचारसरणी पटणारी नव्हती व नाही. तरीही नेत्याविषयी व्यक्ती म्हणून प्रेम असल्याने विधानसभा निवडणुकीत काम केले. प्रत्येक निवडणुकीत बरोबर असणारे बाळासाहेब थोरात यावेळी बरोबर नसल्याने व पक्षांतराचा निर्णय मान्य न झाल्याने जनतेने भाजप विचारसरणी  धुडकावत राष्ट्रवादीच्या डॉ. किरण लहामटे यांना विजयी केले.

विधानसभा प्रस्थापित विरुद्ध जनता अशी झाली. याचा अनुभव तालुक्याने घेतला म्हणून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जे कोणी सहकार्य करेल त्यांना बरोबर घेऊन पुढील वाटचाल सुरु राहणार आहे. मी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांना मानणारा आहे. त्यामुळे अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे. सहकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. असेही पांडे यांनी सांगितले.

Website Title: Latest News Akole politics change 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here