Home अकोले अकोलेत अवैध दारू वाहतूक करताना एकास पकडले

अकोलेत अवैध दारू वाहतूक करताना एकास पकडले

अकोले: थर्टी फर्स्ट आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबविली असून अकोले शहरातून जाणाऱ्या देवठाण रस्त्यावर सोमवारी एका दुचाकीस्वारास अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करताना ताब्यात घेतले आहे.

अकोले तालुक्यातील कळस येथील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. अकोले शहरातून जाणाऱ्या देवठाण रस्त्यावर  हा इसम  आपल्या दुचाकीवर ४२ हजार रुपयांची दारू वाहतूक करताना आढळला. त्यास राज्य उत्पादन संगणक शुल्क विभागाचे निरीक्षक एस.डी. वाजे दुय्यम निरीक्षक रवींद्र कोकरे, निमसे, शेख, पाटोळे यांच्या पथकाने दुचाकीसह दारू ताब्यात घेऊन जप्त केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Website Title: Latest News akole state product department

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here