Home अकोले राजूर प्रदर्शनात सोमलवाडीचा वळू ठरला 2019 चा चॅम्पियन

राजूर प्रदर्शनात सोमलवाडीचा वळू ठरला 2019 चा चॅम्पियन

राजूर: येथील डांगी व संकरीत जनावरांच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील सोमलवाडीचा सोमा भाऊ गंभिरे यांचा वाळू २०१९ च्या राजूर प्रदर्शनात ठरला चॅम्पियन  तर राजाराम भीमा घोटे रा. धामणी ता. इगतपुरी यांच्या वाळूची उप चॅम्पियन म्हणून निवड झाली आहे.

सालाबादप्रमाणे राजूर येथे चार दिवस चालणाऱ्या सुधारित देशी व डांगी जनावरे, शेतीमालाच्या प्रदर्शनात काल वळू निवड स्पर्धा झाली.  प्रामुख्याने यामध्ये चॅम्पियन उपचॅम्पियन निवडीबरोबरच अदातमधून पेढेवाडी ता. अकोले येथील अमृता मुरलीधर कुल्हाळ यांचा वळू प्रथम आला तर सहा दातीमधून पाडळी ता. सिन्नर येथील शरद निवृत्ती वाल्गीर यांचा वाळू प्रथम आला. आठ दातीमध्ये मांजरगाव ता. इगतपुरी येथील विष्णू शंकर बांडे यांचा वळू तर धामणी ता. इगतपुरी येथील भाऊसाहेब कचरू भोसले यांची डांगी कालवड प्रथम आली. गाभण गायीमध्ये धामणी येथील अमोल सुरेश भोसले यांची गाय प्रथम आली. नाशिक येथील हितेश पाटील यांच्या दुभत्या गायीने प्रथम क्रमांक मिळविला. मोगरे येथील काशिनाथ लोहरे यांची डांगी बैलजोडी प्रथम आली. अशा पद्धतीने स्पर्धा होऊन आज मंगळवार दिनांक १७ प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

पशुवैद्यकीय सहायक आयुक्त जे.के.थिटमे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. अशोक धिंदळे, पशुधन अधिकारी पी.एम. पोखरकर तसेच हेमलता पिचड, उपसरपंच गोकुळ कनकाटे, ग्रा. सदस्य गणपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, पत्रकार विनायक घाटकर, गौरव माळवे व आदि प्रमुख ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वरील जनावरांची निवड करण्यात आली.

Website Title: Latest News Rajur Somalwadi Bull becomes the 2019 champion

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here