Home अकोले भंडारदरा परिसरात संगमनेर कसारा गाडीचा अपघात: ७० प्रवासी बचावले

भंडारदरा परिसरात संगमनेर कसारा गाडीचा अपघात: ७० प्रवासी बचावले

भंडारदरा: आज सकाळी निघालेली संगमनेर कसारा या गाडीचा अपघात भंडारदरा परिसरात सकाळी साडे आठ वाजता झाला. या गाडीत सुमारे ७० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी चालकाच्या प्रसंगावधनामुळे बचावले.

अकोले तालुक्यातील रस्त्यावरील  खड्यांमुळे समोरून येणाऱ्या दुचाकी वाहन वाचविताना पुन्हा आज  ८:३० वा. संगमनेर आगारातील बस नं.एम एच १४.बीटी ३८३०ही  संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा  कोलनी जवळ अपघात झालेला आहे. ही  बस संगमनेर आगारातुन कसाराकडे मार्गस्थ झालेली होती.  सुदैवाने  यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. या गाडीत ७० प्रवाशी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतीमुळे होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी बस चालक अे. सी.कोरडे. हे होते  तर वाहक संतोष घुले हे होते .
अकोले तालुक्यात या खड्यांमुळे वारंवार या घटना घडताना दिसत आहे .याचे प्रमुख कारण अकोले तालुक्यात रस्त्यावर असलेले खड्डे.
Website Title: Latest News Accident sangamner kasara bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here