Home अकोले आ. किरण लहामटे यांच्या आंदोलनाने प्रशासनाला खडबडून जाग

आ. किरण लहामटे यांच्या आंदोलनाने प्रशासनाला खडबडून जाग

घारगाव: अकोले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बोटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील खडडे स्वत: टोकर घेऊन बुजवले होते. या गांधीगिरी आंदोलनाने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. याचाच धसका घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कालपासून रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बोटा येथे काही कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते त्यावर अकोले तालुक्यातील भाजप नेत्यांनी टीकाही केली होती. पण त्यांना आमदारांची आंदोलनाची पद्धत अजून समजलेली नाही. डॉ. किरण लहामटे यांनी आपले काम वेगळ्या पद्धतीने सुरुवात केल्याची चर्चा बोटा घारगाव परिसरात रंगली आहे. सामान्य नागरिकांकडून आमदार असावा तर असा असे बोलून कौतुक केले जात आहे.  

Website Title: Latest News MLA Kiran Lahamate Strike effect 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here