Home अकोले अकोलेतील खळबळजनक घटना: तरुणाची दगडाने ठेचून हत्या

अकोलेतील खळबळजनक घटना: तरुणाची दगडाने ठेचून हत्या

अकोले: अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले या १८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून, धारदार हत्याराने डोक्यावर वार करून हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी गर्दनी शिवारातील चिमनदरा भागात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सोमवारी सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. पोलीस पाटील संतोष अभंग यांचे खबरीवरून अकोले पोलिसांत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी शवविचेदन करण्यात आले. तेव्हा मयताचे डोके दगडाने ठेचल्याचे व तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे लक्षात आल्यावर मंगळवारी दुपारनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश हा बारावी इयत्तेत शिकत होता. नांदेड येथे त्याने सीईटी चे क्लासेस लावलेले होते. सुट्टीला तो गावी आला होता. हत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. प्रथमेश याचे मूळ गाव तालुक्यातील पिंपळगाव निपाणी असून त्याचे वडील एकदरा आश्रम शाळेत नोकरीला आहेत.

Website Title: Latest News Akole Young man stabbed to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here