Home महाराष्ट्र पुढील पाच वर्ष भाजपचाच मुख्यमंत्री असेल: देवेंद्र फडवणीस

पुढील पाच वर्ष भाजपचाच मुख्यमंत्री असेल: देवेंद्र फडवणीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकारांसोबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा शब्द कधीच दिला नव्हता. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असे त्यांनी म्हंटले. भाजप नेतृत्वात सरकार स्थापन होणार. शपथ विधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे. १० अपक्षांचा आम्हाला पाठींबा आहे ती संख्या १५ पर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद असा शब्द कधीही दिला नव्हता. कोणती खाते कोणाला द्यायचे हे देखील ठरल नव्हत. शिवसेनेला वाटत असेल पाच वर्ष मुख्यमंत्री आमचाच असेल पण वाटण आणि होणार यात फरक आहे.  भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची उद्या निवड केली जाईल. सामानातून जे काही लिहील जातय त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. आपल्याच मित्र पक्षावर टीका का? कॉंग्रेस राष्ट्रवादीवर इतक्या ताकदीने टीका करावी. अमित शहा उद्या मुंबईत येणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यात औपचारिक व अनोपचारिक बैठका सुरु आहेत.

Website Title: Latest News next five years will be the BJP’s chief minister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here