Home अकोले अकोले : भाजप महिला आघाडी सचिवाविरुद्ध मारहाणीचा व पती विरूद्ध ही गुन्हा...

अकोले : भाजप महिला आघाडी सचिवाविरुद्ध मारहाणीचा व पती विरूद्ध ही गुन्हा दाखल

अकोले : भाजप महिला आघाडीच्या तालुका सचिव मंदाबाई बराते यांचे पती यांचे विरोधात अंगणवाडी सेविकेशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी तर मंदाबाई बराते आणि मनीषा लांडे या दोघींविरुद्ध या अंगणवाडी सेविकेस मारहाण केल्या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्हीही आरोपींना अटक करण्यात आली व त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली.

तालुक्याती एका अंगणवाडी सेविकेचे आपल्या जावेबरोबर जावेन वाघापूर येथील ग्रामपंचायत सदस्या मंदाबाई बराते व त्यांचे पती गणपत बराते यांना वाद झाल्यानंतर बोलावून घेतले. त्यांना माझ्याबद्दल वाईटसाईट सांगितले. त्यानंतर दोघींनी मला मारहाण केली, त्यात माझे गळा व पोटाला मार  लागला तसेच गणपत बराते याने असभ्य वर्तन केले. १५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली.

मंदाबाई ही ग्रामपंचायत सदस्या आहे. तसेच राजकीय पक्षाची कार्यकर्ती आहे. यापूर्वीही तिने मला अनेक वेळा त्रास दिलेला आहे. अशा आशयाच्या अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून गणपत बजाबा बराते, मनीषा अण्णासाहेब लांडे व मनीषा अण्णासाहेब  बराते रा. सर्व वाघापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व आरोपींना पोलीसांनी अटक करून नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप पांडे हे करीत आहेत.

Website Title: Latest News Akole: FIR Filed Against BJP Women’s Rights Secretary, Against Husband And Husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here