Home अकोले सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात गरजू विदयार्थ्यांना शिक्षकांकडून  गणवेशाचे वाटप

सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात गरजू विदयार्थ्यांना शिक्षकांकडून  गणवेशाचे वाटप

राजूर: गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात गरजू विदयार्थ्यांना शिक्षकांकडून  गणवेशाचे वाटप करण्यात आले. राजूर गावातील व परीसरातील विद्यालयातील गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी  विद्यालयामार्फत नेहमी विविध शालेय साहित्याचे वाटप केले जाते.
तसेच दरवर्षीप्रमाणे विद्यालातील २० गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या योगदानातून  शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे  प्राचार्य मा.श्री लेंडे एम.डी., पर्यवेक्षक श्री नरसाळे सर व सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.  विद्यार्थांच्या वतीने कुमारी प्रगती लेंडे ह्या विद्यार्थिनीने सर्व शिक्षकांचे व विद्यालयाचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. 
या स्तुत्य उपक्रमाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन सर्व संचालक मंडळ आदिंनी कौतुक केले.
Website Title: Sarvodaya Vidyalay Rajur Uniforms distributed by teachers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here