Home अकोले अकोले : भाजपला अकोल्याची जागा मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले : भाजपला अकोल्याची जागा मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले : अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला.

मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली, तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा भाजपला मिळाली,

तर ती जिंकण्याचा विश्वास पक्षाचे जि. . गटनेते जालिंदर वाकचौरे तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला. नगरला झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे,

उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, खासदार डॉ. सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा संघटनमंत्री प्रकाश चित्ते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यावेळी उपस्थित होते.

Website Title: Latest News Akole: If BJP Gets Akola’s Place, Then Surely Will Win

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here