Home अकोले अकोले : पोलिसांच्या आशीर्वादाने अकोल्यात अवैध काळे धंदे सुरू

अकोले : पोलिसांच्या आशीर्वादाने अकोल्यात अवैध काळे धंदे सुरू

अकोले : येथील पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या जागेवर राहुरी येथून हनुमंत गाडे आले आहेत. पहिल्याच दिवशी अवैध धंदे करणाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. निरीक्षक देशमुख यांनी पोलिस व स्थानिक पुढाऱ्यांतील वाटाघाटी व अवैध धंदे बंद केले होते. मात्र, आता गाडे यांनी कार्यभार स्वीकारला नाही तोच अवैध धंद्यांनी डोके वर काढले. 

मध्यंतरी जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार काही काळ बंद पडलेले मटका, अवैध दारूविक्री, अंमलीपदार्थ विक्री, अवैध प्रवासी व वाळू वाहतूक व जुगाराचे अड्डे आता गाडे यांच्या आगमनानंतर पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. अवैध धंदे बंद करणे ज्यांचे काम आहे, तेच हे धंदे पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी दारोदार फिरताना दिसतात. अनेक ठिकाणी पोलिसांचे खबरे, हस्तक व हितचिंतक बंद अवैध धंद्यातील चालकांना भेटून नव्याने हप्ते ठरवून देण्याचे काम करत आहेत. काही ठिकाणी स्थानिक बीटचे पोलिस कामाला लागले आहेत. अकोले शहर व परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या हाॅटेलचालकांना १५ ते २० हजार, मटका चालकांना १ ते २ लाख, जुगारअड्डा चालकांना १० हजारांपासून ५० हजारांचा हप्ता भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. ज्या ज्या हाॅटेल व धाब्यावर जाऊनही हप्ता जास्त होतो म्हणून हप्ते देण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकांना तुम्ही कसा काय धंदा करतात तेच पाहून घेऊ, अशी दमबाजी केली जाते. 

अकोले बसस्थानक व शहरातील विविध भागात जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत नाही. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नंबरप्लेट नाहीत. ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त अवैध वाळू वाहतूक करतात. गांजा, आफू, चरसची खुलेआम विक्री केली जात आहे. पोलिस अधीक्षक सिंधू यांनी हे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. 

गुन्हे दाखल करण्याची पोलिसच देतात धमकी 
यापूर्वी मी पोलिसांनी सांगितल्यानुसार हप्ते वेळेवर देऊन अवैध दारूविक्री करायचो. केसेस केल्या आहेत हे दाखवण्यासाठी पोलिसांनी छापे टाकून माझ्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक देशमुख आल्यावर मी अवैध दारूविक्री बंद केली. पण गेल्या चार-पाच दिवसांपासून माझ्याकडे पोलिस येतात व पुन्हा अवैध दारूविक्री सुरू करून आम्हाला २० हजार रुपये व संगमनेर व नगर येथील पोलिस व एक्साईजला हप्ता दे, नाहीतर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगतात. त्रस्त हाॅटेल व्यावसायिक.

Website Title: Latest News Akole: With The Blessings Of Police, Illegal Trading In Akola

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here