Home अकोले अकोले: अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोले: अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोले: अकोलेतील चितळवेढे शिवारात प्रवरा नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या दोन आरोपींवर राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. परंतु अहमदनगर गुन्हे शाखेतील पोलीस नाईक संतोष लोंढे, हवालदार कमलेश पाथरूट, रणजीत जाधव, प्रकाश वाघ, यांच्या पथकाने चितळवेढे शिवारातील प्रवरा नदीपात्रात छापा टाकला असता त्यांना प्रवरा पात्रात दोघेजण आपल्या ताब्यातील ट्रक्टर व केनीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरी करताना आढळून  आले. घटनास्थळी ट्रक्टर, केणी या वाळूच्या दीड ब्रास ढीग मिळून आला. याप्रकरणी हवालदार प्रकाश गणपत वाघ यांनी राजूर पोलिसांत फिर्याद दिल्याने राजूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या सुदाम किसन आरोटे व आरोटे हे फरार झाले आहेत.. विना नंबरचा स्वराज्य कंपनीचा ट्रक्टर केनी असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहायक फौजदार प्रकाश निमसे करीत आहे.


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Akole Offense against sand fasting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here