Home अकोले अकोले आगार बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास

अकोले आगार बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास

अकोले: अकोले आगराकडून भंडारदऱ्याच्या आदिवासी भागाला पुरविल्या जाणाऱ्या बससेवेत सातत्य ठेवले जात नाही.खटारा गाड्या पाठवून आदिवासी प्रवाश्यांच्या जीवाशी अकोले आगार खेळत असल्याचा प्रकार सुरु आहे हा प्रकार जर तातडीने थांबविण्यात आला नाही तर भंडारदऱ्याच्या आदिवासी भागात एकही बस फिरू देणार नसल्याचा इशारा भंडारदरा परिसरातील जेष्ठ नागरिक आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्राप्त पांडुरंग इदे यांनी दिला आहे.

अकोले अगाराकडून भंडारदरा धरण परिसरात तसेच पाणलोटात काही ठराविक गाड्या धावत आहेत परंतु या गाड्यांची अवस्था अतिशय कठीण अशी झालेली आहे भंडारदरा आदिवासी भागात पाठविल्या जाणाऱ्या अनेक बसेस मोडण्याच्या स्थितीत आहेत काही बसेसला खिडकीच नाही तर काहींचे स्पेअरपार्ट दोरीने बांधलेले आहेत. अनेकदा या भागात पाठविल्या जाणाऱ्या बसेस मुक्कामी जाणाऱ्या ठिकाणीच तर काही प्रवाशी वाहतूक करीत असतानाच रस्त्यातच नादुरुस्त होतात त्यामुळे त्या आहे त्या ठिकाणीच उभी करण्याची नामुष्की मंडळावर येते. त्यामुळे गाडीतील प्रवाशांवर दुसरी गाडी येईपर्यत वाट पहावी लागते.

अकोले आगाराचा दुट्पीपणा आता उघड झाला असून शहरी भागांसाठी चांगल्या बस पाठविल्या जात आहेत, तर भंडारदरा परिसरात मात्र आदिवासी बांधव ओरड करत नसल्याने नादुरुस्त, खिळखिळ्या  झालेल्या गाड्या पाठवून दिल्या जाताहेत. याबाबत अकोले आगाराचे आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता आगाराला फक्त ४० गाड्यांचा पुरवठा महामंडळाकडून करण्यात आलेला आहे. आमच्यापुढे दुसरा पर्याय नसल्यानेच आम्ही या बसेसचा वापर करीत आहोत असे स्पष्टीकरण देण्यात आले.


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Akole Deadly journey for passengers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here