Home अकोले अकोलेत चोरांची नवी शक्कल: वाळूची अलिशान गाडीत वाहतूक

अकोलेत चोरांची नवी शक्कल: वाळूची अलिशान गाडीत वाहतूक

अकोले: टेम्पो, ट्रक, ट्रक्टरमधून होणारी वाहतूक आता अलिशान मोटारीतून सुरु झाली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाला चकमा देण्यासाठी वाळूचोरी करण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. अशाच प्रकारे अलिशान मोटारीतून वाळू वाहतूक करताना अकोले पोलिसांनी आज पहाटे कळस येथील प्रवरा नदीच्या पुलावर एकास पकडले. भाऊसाहेब रामनाथ साळवे रा. मंगळापूर ता. संगमनेर असे या त्याचे नाव आहे. अर्धा ब्रास वाळू व मोटार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याबाबत हवालदार चंद्रकांत सदाकाळ यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कळस येथील प्रवरा नदीच्या पुलावर काल पहाटे साडे तीनच्या सुमारास संशयावरून पोलिसांनी मोटार अडविली. तपासादरम्यान मोटारीत अर्धा ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब साळवे यास ताब्यात घेतले. मोटार व वाळू जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Akole Sandy trails transport

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here