Home अकोले संगमनेर २४ हजार तर अकोलेत १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा

संगमनेर २४ हजार तर अकोलेत १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा

अहमदनगर: जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोहेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी १३५ कोटी रकमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रकमेपैकी जवळपास १०० टक्के रक्कम २ लाख ४५ हजार ५४७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांचे ४४९ कोटी रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानुसार राज्यसरकारने नुकसान भरपाईपोटी १३५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या भरपाईच्या रकमेची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या नावानुसार वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम सम्भंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. सरकारने जिरायत आणि बागायत भागातील पिकांसाठी सरसकट ८ हजार रुपये आणि फळबागाना १८ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदतीची रक्कम जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे.

मदत मिळालेली शेतकरी : नगर १७ हजार ६५४, अकोले १९ हजार ४४७, जामखेड ४ हजार ८४१, कर्जत १३ हजार ३९३, कोपरगाव १३ हजार ६८३, नेवासा १३ हजार ७२४, पारनेर २३ हजार ६२२, पाथर्डी ३३ हजार ९८७, राहुरी १४ हजार २९१, संगमनेर २४ हजार ४९८, शेवगाव १९ हजार ९७२, श्रीगोंदा १५ हजार २१३, श्रीरामपूर ११ हजार ९२५, राहता ९ हजार ३०६ यांचा समावेश आहे.   


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Deposit of funds to farmers account

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here