Home अकोले अकोले:शेतीच्या वादातून शेतकऱ्याला आपल्या मुलांकडूनच मारहाण

अकोले:शेतीच्या वादातून शेतकऱ्याला आपल्या मुलांकडूनच मारहाण

अकोले: अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील कोतूळ येथील शेतकरी गेनू धोंडीबा भुजबळ वय ७५ यांना काल त्यांच्या शेतामध्ये यांच्याच मुलांकडून मारहाण करण्यात आल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जखमी वृद्ध शेतकऱ्यावर अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मुळा परिसरातील शेतकरी दिलीप काशिनाथ भुजबळ,प्रवीण काशिनाथ भुजबळ, आशिष सुनील भुजबळ, विजय भाऊसाहेब मंडलिक, सखुबाई काशिनाथ भुजबळ, दुर्गा सुनील भुजबळ, रत्ना भाऊसाहेब मंडलिक, सुनील गेनू भुजबळ या आधी काल गेनू भुजबळ यांच्या मालकीची शेतामध्ये ट्रक्टर जेसीबी ने काम करत असताना काल अचानक या वृद्ध शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन माझ्या मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान केली. तुम्ही माझ्या शेतातील मालाचे नुकसान का करता अशी विचारणा केली असता संबंधित इसमांनी अचानक येऊन मला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

माझे वय ७५ वर्ष असून या आठ जणांना मी प्रतिकार करू शकत नव्हतो, मात्र ज्यावेळी मला मारहाण करीत होतो. त्यावेळी तेथे असणारे माझे नातू नवनाथ व नात सुन वैशाली यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात माझ्या नातवाला व नात सुनेला मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी देऊन प्रवीण काशिनाथ भुजबळ त्यांच्या हातातील कोयत्याने नातवाच्या हाताला कोयता मारून जखमी केले.

भांडकोळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हेगारंवर कारवाई करावी अशी मागणी भुजबळ यांनी मागणी केली. या आरोपींवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. पांडे हे तपास करीत आहे.


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Akole Farmer was beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here