Home अकोले सर्वोदयच्या शुभम लांडगेला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

सर्वोदयच्या शुभम लांडगेला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

राजुर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकत्याच दिल्ली येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील १९ वर्षाखालील मुले ४८ किलो वजनगटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात शुभम लांडगे याने रौप्य पदक   संपादन केले. या विद्यार्थ्याला एम. एन. देशमुख कुस्ती संकुल (साई सेंटर)मधील साई मार्गदर्शक श्री. तानाजी नरके, प्रा.विनोद तारू, भारत भोसले, भाऊसाहेब बनकर, जालिंदर आरोटे यांनी मार्गदर्शन केले. 

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख, सचिव टी. एन. कानवडे,  सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व व्यवस्थापक प्रकाश महाले सर्व संचालक मंडळ, संगमनेर अकोले न्यूजचे कार्यकारी संपादक प्रा.अजित गुंजाळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन केले.

Website Title: Latest New svm Rajur national wrestling competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here