Home अकोले अकोले येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने अकोले बस स्थानक येथे धडक मोर्चा

अकोले येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने अकोले बस स्थानक येथे धडक मोर्चा

अकोले: आज अकोले येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मॉर्डन कॉलेज ते बस स्थानक अकोले येथे धडक मोर्चा काढण्यात आला. आगार प्रमुख यांना अकोल्यातील असणाऱ्या बस समस्या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिले परंतु कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नव्हता. आज या मोर्चामुळे 2 वर्षापासून बंद असलेली बस  गर्दनी गावात बस सुरू झाली व अजून फेऱ्या वाढवण्यात येणार आहे असे आश्वासन आगर प्रमुख यांनी स्वतः आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोर्चा येऊन देण्यात आले. त्याच प्रमाणे कुंभेफळ ,डोंगरगाव ,वेल्हाळे ,चास, देवठाण,आबड,कोतुळ, राजूर गावात नवीन बसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.

त्यानंतर अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांची छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अकोल्यातील  रस्त्याचे असणाऱ्या अडचणी संदर्भात, बसच्या अडचणी, मराठी शाळाच्या असणाऱ्या अवस्था संदर्भात मागण्या मांडल्या  व त्यावर लवकर मार्ग काढण्यात येईल अशी चर्चा झाली .

यावेळी छात्र भारती चे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा अध्यक्ष काकड प्रशांत, अकोले तालुका उपाध्यक्ष वैष्णवी कर्णिक, सचिव मोनाली चौधरी, सदस्य गणेश पवार, सचिन अरगडे , प्रियांका चासकर ,निखिल देशमुख, ओंकार नवले ,गणेश जोंधळे ,तृप्ती जोर्वेकर, शीतल रोकडे, प्रमोद मोदड, राधेश्याम थिटमें ,हृतिक वर्पे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Website Title: Latest News Chatrabharati rally at Akole Bus Station 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here