Home अकोले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देणार: आ. डॉ. किरण लहामटे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देणार: आ. डॉ. किरण लहामटे

अकोले: अकोले तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्नांना आपण हात घालणार असून या निमित्ताने आरोग्य, पाणी, रस्ते, वीज या मुलभूत सुविधांकडे आपण कटिबद्ध आहोत. तसेच वाशेरे गावासाठी सर्वोतोपरी मदत करून गावाचा विकास करणार त्यासाठी आपण तालुक्याचा विकास आराखडा तयार करू असे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठीकडे त्यांचा प्रचंड अपेक्षांची ओझी वाढली आहे ते हलकी करण्यात आपला उत्साह कायम ठेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील वाशेरे येथे त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

आमदार लहामटे म्हणाले की, प्रामुख्याने गावातील पाणी रस्ते विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मदत करील अशी ग्वाही दिली.

यावेळी जेष्ठ नेते संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, विनय सावंत, शांताराम गजे, संदीप शेणकर , विनोद हांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्यात प्रामुख्याने तरुणाईचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी शांताराम गजे, माजी सरपंच आशा वाकचौरे, विनय सावंत, संपत नाईकवाडी, संजय वाकचौरे, निलेश गजे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद वाकचौरे यांनी व प्रास्ताविक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले.


जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Kiran Lahamte Government will provide relief

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here