Home अकोले नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तुळशी विवाह संपन्न हजारोंची उपस्थिती

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तुळशी विवाह संपन्न हजारोंची उपस्थिती

कोतूळ: आकर्षक रंगीत लग्न पत्रिका, त्यात प्रमुख उपस्थित अतिथी, कार्यवाहक, आशिर्वाद देणाऱ्यांची आणि प्रेक्षकांची भली मोठी यादीसोबत मामा व मित्र परिवाराचा असलेला उल्लेख, घरोघरी जाऊन दिलेले प्रत्यक्ष निमंत्रण, सनईचे मंजुळ सूर, ढोल ताशांचा नाद, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, मान्यवरांचे सत्कार, व-हाडी मंडळीची लगबग, नटलेल्या करवल्यांची लुडबुड, स्वागतासाठी दरवाजात उभे असणारे यजमान, अंगावर शिंपडले जाणारे अत्तर, आलेल्या प्रत्येक महिलेच्या केसात गजरा, पुरुषांना लावले जाणारे गंध, आकर्षक रितीने मांडलेला रुखवत, चढाओढीने गायिलेली हळदीची गाणी, वधुवरांची निघालेली भव्य मिरवणूक आणि लग्नात भक्ती संगीत, मोतीचूर बुंदी लाडू व चिवड्याची  मेजवानी, अक्षदांच्या बरोबरीने फुलांची उधळण, आहेर स्विकारण्याकरता उडालेली धांदल, लग्नानंतर लगेचच जागरण गोंधळ या सगळ्यात सर्व काही अगदी घरचेच कार्य आहे असे समजून राबणारे महिला आणि पुरुष कार्यकर्ते, सामान्य नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी  ते नवनिर्वाचित आमदार यांच्यापासून हजारो नागरिकांच्या उपस्थितीचे असे हे भव्य वर्णन कोणा राजकीय पुढाऱ्याच्या घरातील लग्नाचे नसून अकोले तालुक्यातील कोतूळ येथे रविवारी गोरज मुहुर्तावर संपन्न झालेल्या नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तुळशी विवाहाचे आहे . 
       कार्तिकी एकादशीनंतर महाराष्ट्रामध्ये लग्नाची धामधूम सुरू होते. कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान तुळशी  विवाह सोहळा पार पडतो. यादरम्यान लक्ष्मीच्या रूपातील तुळशीचा भगवान विष्णू यांच्या रूपातील शाळीग्रामाशी विवाह पार पडतो. सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थान व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ, कोतूळ (ता. अकोले) यांच्या वतीने हा अनोखा विवाह सोहळा गणपती मंदिराच्या प्रारंगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार डॉ.किरण लहामटे, भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रमोद लहामगे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सयाजी देशमुख, ह.भ.प रामनाथ महाराज जाधव, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सुनिल राउत, शशिकांत शिंदे, भाऊसाहेब देशमुख, भाऊसाहेब गिते, शिक्षक बँकेचे संचालक गंगाराम गोडे, कैलास नेवासकर, उत्तम देशमुख, दत्तात्रय दुटे गुरुजी, संकेत आरोटे, रमेश देशमुख, एकनाथ आरोटे, काशिनाथ पोखरकर, वसंतराव देशमुख, अरूण पोखरकर, शरद बनसोडे, सुनिल पाबळकर, नंदू कानकाटे,सुनील काळे,दत्तात्रय फुलसुंदर ,विठ्ठल शेळके, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 
प्रारंभी कु.स्वरा नेवासकर हिने अतिशय सुमधुर भक्तिगीताने वातावरण भारावून टाकले. अजित दिघे सर यांनी व्याख्यानाद्वारे हिंदू धर्माची महती विषद केली. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी सर्वांचे स्वागत करून मान्यवरांचा सन्मान केला.
        हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी तुकाराम आरोटे, मुकुंद खाडे, गणेश गिरे, विशाल बोऱ्हाडे, निवृत्ती पोखरकर, प्रा. दिपक राउत, संभाजी पोखरकर, योगेश समुद्र, प्रशांत परशुरामी, संतोष नेवासकर, पुरषोत्तम परशुरामी, अविनाश गिते, सचिन पाटील, बंटी देशमाने, कुलदीप नेवासकर, अनिल खरात, प्रदीप भाटे, अजित दिघे, वासुदेव साळुंके, संतोष बोऱ्हाडे, अनिल पाठक,तुकाराम वैद्य,संतोष देशमुख,संजय गवारी, मिना आरोटे, द्वारका पोखरकर, अर्चना लहामगे, सविता घाटकर, शुभांगी खाडे, वंदना पाठक, वर्षा नेवासकर, प्रियंका नेवासकर, विद्या परशुरामी, वृषाली समुद्र, दिपाली राऊत, सुरेखा साळुंके, वनिता परशुरामी, अनुराधा पाठक, उमा दिघे, वैष्णवी गोडे आदींनी विशेष प्रयत्न केले.

जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Biggest Tulsa wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here