Home अकोले पाटणकरांनी आदिवासी भागात शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली: भरत सावंत

पाटणकरांनी आदिवासी भागात शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली: भरत सावंत

राजूर(प्रकाश महाले): सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत रा वि पाटणकर यांनी स्वातंत्र्यानंतरच्या दशकात अकोले तालुक्याच्या आदिवासी भागाचा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे हे त्यांनी हेरले आणि शाळा,आश्रमशाळा,वसतिगृहे सुरू केली.शिक्षणाबरोबरच आदिवासी भागात विविध उपक्रम राबविले. सर्व ऐहिक सुखे पायाशी लोळण घेतील अशी परिस्थिती असतानाही या सर्वस्वाचा त्याग करत आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी घालविले म्हणून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सर्वोदय कार्यकर्ते भरत सावंत यांनी केले.
       पाटणकर यांच्या15 व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यनिकेतन परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.त्यांच्या अस्थी कलशावर आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्वधर्मीय प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
१९५०च्या सुमारास पुणे येथे अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे शिक्षणशास्त्र पदवी प्राप्त केली.पुढे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पाटणकर यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. सर्वोदय योजनेच्या माध्यमातून ते अकोले तालुक्यातील राजूर येथे आले.सर्व डांगाण भागची पायपीट करत त्यांनी परिस्थिती समजावून घेतली. सर्वोदय योजनेच्या माध्यमातून विविध योजना राबवत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने काम त्यांनी केले .आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मानत त्यांनी व सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शेंडे,कोषाध्यक्षा सावित्रीबाई मदन व राजूर मधील सुंदरशेठ शाह,डॉ पी पी कोठारी आदींबरोबर सर्वोदय विद्या मंदिराच्या रूपाने १९५८ मध्ये पाटणकर यांनी या राजूर येथे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज याचा वेलू गगनाला भिडला आहे.आज या संस्थेची धुरा अध्यक्ष जेष्ठ विधितज्ञ मनोहरराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व संचालक मंडळ समर्थपणे सांभाळत आहे.आपले संपूर्ण आयुष्य पाटणकरांनी  तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शिक्षण आणि सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले होते.दिलेल्या पाटणकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सत्यनिकेतन परिवाराने अभिवादन सभा आयोजित केली होती.

यावेळी संस्थेचे सहसचिव मिलिंद उमराणी,संचालक एस टी एलमामे, एन डी बेल्हेकर,विलास पाबलकर, विजय पवार,व्यवस्थापक प्रकाश महाले,सदस्य एम के बारेकर,बी एस शिंदे,अशोक पवार,रजनी टिभे,प्राचार्य डॉ बाबासाहेब देशमुख, उपप्राचार्य एल पी परबत,अंतुराम सावंत, मुख्याध्यापक के एल नवले, संजय शिंदे, शामराव साबळे ,संस्था परिवारातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी अनेकांनी आपल्या मनोगतातातून पाटणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविक पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे ,सूत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केले. आभार सहसचिव उमराणी यांनी मानले.
Website Title: Latest News Patankar set the stage for education

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here