Home अकोले आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

अकोले: निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेने घेतलेली वेगळी भूमिका आणि कोणताही राजकीय पक्ष १४५ हा आकडा गाठण्यात सफल न ठरल्याने राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सत्तेसाठी जुळवाजुळव केली असून महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता करायची नाही असे सांगितले. तसेच आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार नाही असे सांगून तुमच्या मतदारसंघामध्ये जाऊन जनतेची काम करा असा आदेशही दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदरात १३ मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यातच डॉ. लहामटे यांचा राजयोगच चांगला असल्याने मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा अकोलेकरांमध्ये आहे. महाशिव आघाडीमध्ये आदिवासी चेहरा नसल्याने शिवाय शिक्षित आणि तरुण व्यक्तिमत्व असणारे डॉ. किरण लहामटे यांचा मंत्रीपदाचा विचार नक्की होणार आणि आदिवासी भागातील विकास नक्की होणार असल्याची ग्वाही अकोलेकर देत आहे.  


जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest news MLA Kiran lahamte may be future minister 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here