Home अकोले अकोले: कामगारांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले: कामगारांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले: मवेशी ता. अकोले येथून परप्रांतीय २३ मजुरांना घेऊन जाणारा दहा टायरचा ट्रक काल दि. ८ रात्री अकोले पोलिसांनी पकडला. तसेच ट्रक चालकविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजूर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत्या असणाऱ्या मवेशी तालुका अकोले येथे सिमेंटच्या गोण्या घेऊन हा ट्रक क्रमांक एम.एच. १४ जीव्ही. १५७४ आला होता. मात्र परतीच्या प्रवासात चालकाने २३ कामगारांना ट्रक मध्ये बसवून तो नाशिकडे निघाला होता. हा ट्रक अगस्ती कारखाना रोड महात्मा फुले चौकात आला असता अकोले पोलीस ठाण्यातील ग्रस्त घालणारे पोलीस कर्मचारी मैड, लहामगे व पिचड यांनी थांबविला त्याची ट्रकची तपासणी केली असता त्यात मजूर असल्याचे उघड झाले. त्यांनतर सर्व कामगारांना खाली उतरविण्यात आले आणि त्यांनी उठाबशा काढण्याची पोलिसांनी शिक्षा दिली.

वाचा: संगमनेर: वाघापूर गावात कुत्र्यानेच बिबट्याला पिटाळून लावले

त्यानंतर तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या आदेशावरून या सर्व कामगारांना पुन्हा मवेशिला सोडण्यात आले. ट्रकमालक भावड्या शेलार व चालक शंकर सदाशिव पवार यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहे.    

Website Title: Latest News Filed a case against a truck driver 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here