Home अकोले अकोले: मुळा नदीपात्रात दिव्यांग युवकाचा मृत्यू

अकोले: मुळा नदीपात्रात दिव्यांग युवकाचा मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील कोतूळ येथील कोतुलेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून एका दिव्यांग युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भाऊराव गणपत मेंगाळ असे या युवकाचे नाव आहे. कोतूळ येथील मुळा नदीपात्रात रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील पाच सहा लोक मासे पकडण्यासाठी कोतुलेश्वर मंदिर परिसरात आले असता भाऊराव हा पायाने अपंग असल्याने डोहाच्या कडेला एका मोठ्या दगडावर बसलेला होता.

वाचा: पुतण्याने ट्रक्टर अंगावर घालुन केला चुलत्याचा खून

सोबत असलेले काही लोक काही अंतरावर मासे पकडण्यासाठी दूरपर्यंत गेले होते. ते मागे परत आले असता तो नदीपात्रात मृत अवस्थेत आढळून आला. अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दिव्यांग युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

वाचा: संगमनेर तालुक्यात डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून

Website Title: Latest News Death of a crippled youth in Mula river Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here