Home अकोले Latest News: अकोले: वीरगावचे ते पाच जण होमकोरांटाइन

Latest News: अकोले: वीरगावचे ते पाच जण होमकोरांटाइन

वीरगाव: मुंबईतून भिवंडीहून आलेले अकोले तालुक्यातील वीरगावचे तीन आणि घरी असलेले दोघे असे एकाच कुटुंबातील पाच जणांची तपासणी झालीच नाही त्यामुळे त्यांना १४ दिवसांसाठी होमकोरांटाइन करण्यात आले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा मुलगा, त्याची पत्नी आणि आई हे तिघे जण मुंबईहून आल्यानंतर घरी काही तास थांबले. गावकर्यांनी त्यांना आणि कुटुंबातील आणखी दोघे जणांना तत्काळ आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होमकोरांटाइन केले. सोमवारी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी सकाळीच त्यांची तपासणी करून देवठाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. नागरे आणि पर्यवेक्षक डॉ. मिलिंद हिवरे यांना पाचही जणांना अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटल तपासणीसाठी पाठविले. अहमदनगरला सर्वांची वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली. सर्दी खोकला ताप असा कशाचाही त्रास होत नसल्याने त्यांची करोनाची तपासणी झाली नाही. म्हणून १४ दिवस कुणाशीही संपर्कात न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्वही जणाची व्यवस्था विरगावाच्या प्राथमिक शाळेत करण्यात आली असून आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Website Title: Latest News five people from virgaona are home quarantine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here