Home महाराष्ट्र चांगली बातमी: मुंबईत करोना रुग्णांची होतेय घट ३५ टक्के घट

चांगली बातमी: मुंबईत करोना रुग्णांची होतेय घट ३५ टक्के घट

मुंबई: करोनाच्या विळाख्यात सापडलेली मुंबईसाठी चांगली बातमी आहे. मुंबईत काल बुधवारी करोना रुग्णांची ३५ टक्के घट झाली आहे. बुधवारी करोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ मृत्यू झाले आहेत. मागील ११ दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे. मागील आठवड्यात ९ ते १६ जणांचा मृत्यू होत होता.

गेल्या तीन दिवसांपासून पालिकेने टेस्टिंगचे मापदंड बदलले आहे त्यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहे. मुंबईत एकूण ११४ जणांचा मृत्यू झाला आहे तर सोमवारी सर्वात जास्त ९ जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी हा आकडा वर आला आहे.  मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टककेनी घटला आहे.

राज्यात रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत १७ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण १८१ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे.   पालिकेने टेस्टिंगचे मापदंड बदलल्याने चांगला परिणाम दिसून येत आहे असे सूत्रांनी सांगितले.

Website Title: Coronavirus good news patient decreases

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here