अहमदनगर:करोनाबरोबरच आता सारीने जिल्ह्यात पाय रोवायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बुधवारी चार नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात सारीच्या रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच सारी आजाराने डोके वर काढले आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. सारीचे लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचा तीव्र त्रास असलेल्या रुग्णांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही संख्या २५ वर पोहोचली असून या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे:
वय वर्ष ५ वरील व्यक्तींना अचानक ३८ सेल्सिअस ताप येणे.
खोकला, घशात खवखव होणे.
चालताना धाप लागणे.
श्वास घेण्यास त्रास होणे.
Website Title: sari disease Ahmednagar patient