अहमदनगर जिल्ह्यातील ५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तसेच पेट्रोलबाबत ब्रेंकिंग
अहमदनगर: जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आणखी २२ व्यक्तींचे अहवाल हाती आले नाहीत. या ५६ व्यक्तींचे नमुना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. श्रीरामपूर येथील ११, नेवासा येथील २४, नगर शहर ६, पाथर्डी तालुका ३, राहता ३, पाथर्डी तालुक्यातील २, राहुरी २, कोपरगाव ४ तर संगमनेर, अकोले, कर्जत प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आहेत. करोनाग्रस्त फ्रांस येथील परदेशी नागरिकाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डो. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
अहमदनगर ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाना पेट्रोल सकाळी ५ ते ९ या वेळेत मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांनी सुधारित आदेश काढून सूचना देण्यात आले आहे.
Website Title: Latest News Ahmednagar report negative