Home महाराष्ट्र Coronavirus: करोनाग्रस्त रुग्ण डॉक्टरांवर थुंकला

Coronavirus: करोनाग्रस्त रुग्ण डॉक्टरांवर थुंकला

Coronavirus /पनवेल: पनवेल शहरात सोमवारी सापडलेला रुग्ण करोनाग्रस्त असलेला रुग्ण डॉक्टरांच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार घडला आहे. त्या रुग्णाने सरकारी रुग्णालयातील उपचाराला विरोध केला याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

करोना बाधित रुग्ण हा इस्राईल तलावाशेजारील एका इमारतीमध्ये राहतो. त्याची इच्छा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेण्याची होती. मात्र पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला कोविड १९ हे स्वतंत्र रुग्णालय उपचारासाठी केल्याने तेथे दाखल केले. त्यामुळे रुग्ण व आरोग्य अधिकारी यांच्यात वादावादी झाली. सोमवारी संबंधित रुग्ण डॉक्टरांवर थुंकल्यावर डॉक्टर व पारिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत त्याला उपचार दिले. तेथील डॉक्टरांनी सुरक्षा कवच घातलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.

Website Title: coronavirus coronary patient spit on the doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here