Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विदेशी दारू चोरून पोबारा

संगमनेर तालुक्यात विदेशी दारू चोरून पोबारा

संगमनेर: तालुक्यातील घारगाव येथे हॉटेल प्राईडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार १३० रुपये किमतीचे विदेशी दारू चोरून पोबारा केला आहे. ही घटना रविवारी दिनांक १२ एप्रिल रोजी रात्री आठ ते सोमवार दिनांक १३ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. लॉकडाऊन मध्ये दारू बंदी आहे दारू मिळत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडून येत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घारगाव याठिकाणी सचिन बबन कजवे यांचे हॉटेल प्राईड आहे. सध्या करोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी उचालला. रविवार ते सोमवार या दरम्यान बंद असलेले हॉटेल प्राईडचे कुलूप रात्रीच्यावेळी कशाने तरी तोडून आतमध्ये प्रवेश केला. आणि ७१ हजार १३० रुपये किमतीचे विदेशी दारू चोरून पोबारा केला. ही बाब गुरुवार दिनांक १६ एप्रिल रोजी सचिन कजवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Website Title: News theft of international Wine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here