Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात सारी रुग्णांची संख्या ४२ वर, करोना २१ अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यात सारी रुग्णांची संख्या ४२ वर, करोना २१ अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले स्त्राव नमुन्यापैकी २१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच बुधवारी १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

जिल्ह्यात सारी रुग्ण आढळून येत असून ११ एप्रिलपासुन ते आत्तापर्यंत ४२ रुग्ण सापडले आहे. त्या व्यक्तींवर जिल्हा रुग्णालयात तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेतील मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात २३ पुरुष, १५ स्त्री, आणि ४ मुले यांचा समावेश आहे.

दरम्यान जिल्हा रूग्णालयाद्वारे १२१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने पाठविण्यात आले त्यातील ११४५ जणांचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यात १४ दिवस पूर्ण केलेल्या दोघा परदेशी नागरिकाचा समावेश आहे.

Website Title: Latest News sari and coronavirus disease 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here