Home अकोले 23 जानेवारी रोजी केंद्रिय मंत्री रामदास आठवले अकोलेत

23 जानेवारी रोजी केंद्रिय मंत्री रामदास आठवले अकोलेत

अकोले:  केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री, तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले हे  गुरुवार दि २३ जानेवारी  रोजी अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून कळस कृषी प्रदर्शन चे उदघाटन त्यांचे हस्ते होणार असल्याची माहिती रिपाइंचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर ना आठवले येत असल्याने या दौऱ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अकोले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तयारी अंतिम टप्प्यात आहे.  नगर,  जिल्ह्यतून मोठया प्रमाणात नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार २३ जानेवारी रोजी ना आठवले   सकाळी १० वाजता कळस बु  येथे  आगमन होईल.  कळस बु ग्रामस्थ अकोले तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतील.

अकोले  महात्मा फुले चौकात अकोलेकरांच्या व रिपाइं शहर कमेटीच्या वतीने  स्वागत करण्यात येईल व नंतर अकोले येथे होत असलेल्या नियोजित  कळस कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास १०.३०वाजता वाजता उपस्थित राहतील, ११.३० वाजता रिपाइंचे पक्ष कार्यालय उद्घाटन वसंत मार्केट अकोले येथे  होईल. नंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्यालयात भेट राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे स्वागत करतील. रिपाइंचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांचे सुगाव येथील निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा अर्थात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

वाचा: संगमनेर तालुक्यात वृद्धाचा संशयास्पद मृत्यू

नंतर आठवले संगमनेर च्या दिशेने रवाना होणार आहे .तरी अ नगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी प्रत्येक तालुक्यातील कार्यकारणी  पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी  उपस्थित रहाण्याचे आवाहन माजी तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, रमेश शिरकांडे, तालुकाध्यक्ष गौतम पवार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, सुरेश देठे, सचीन खरात, प्रवीण देठे, सावळेराम गायकवाड,  संदीप शिंदे, शंकर जगधने, कमलेश कसबे, बाळासाहेब सरोदे आदिंनी केले आहे.

Website Title: Latest News Minister Ramdas Athawale in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here