Home अकोले अबितखिंड  येथे महावितरण कंपनीतर्फे ‘जनसंवाद’ या मोहिमेचे आयोजन

अबितखिंड  येथे महावितरण कंपनीतर्फे ‘जनसंवाद’ या मोहिमेचे आयोजन

अकोले: तालुक्यातील ग्रामीण आदिवाशी भागात अबितखिंड  येथे वीज वितरण (महावितरण) कंपनीतर्फे ‘जनसंवाद’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार,२० जानेवारी सकाळी ‘जनसंवाद’ मोहिम वीज वितरण कंपनीच्या राजूर उप विभागामार्फत राबविण्यात आली. याद्वारे ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून अनेक तक्रारींचे जागेवर निवारण करण्यात आले.

       वीज ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन वीज वितरण कंपनीचा कारभार लोकाभिमुख व्हावा व ग्रामीण भागातील सेवेचा दर्जा आणखी उंचवावा,व ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाय योजना करण्याच्या उद्देशाने या जनसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता सुनील राऊत यांनी दिली.

      यावेळी उप कार्यकारी अभियंता राऊत यांनी वीज वितरण कंपनीच्या वतीने  ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.व वीज बिल भरून कंपनीला सहकार्य करण्याचे अवाहन केले.

     या वेळी पळसुडेचे माजी सरपंच पांडुरंग कचरे, ,एकनाथ कचरे,सातेवाडीचे माजी सरपंच मारुती मुठे,शिवराम दिघे,उपसरपंच किसन मुठे,कैलास राउत,दिनकर भवारी,मारुती दिघे,लक्ष्मण मुठे,सोमनाथ मुठे,सुहास कचरे,पुनाजी मुठे,भरत दाभाडे,काशिनाथ ठोगिरे,किरण नाडेकर,यांच्या सह परिसरातील सातेवाडी,मोरवाडी,पळसुंडे,अबितखिंड,खेतेवाडी,येसरठाव येतील वीज ग्राहक सकाळी थंडी असतानाहीमोठ्या संख्येने  उपस्थित होते.ग्रामीण भागात आश्या प्रकारे प्रथमच वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून जनतेशी संवाद सादला याचा या भागातील विजेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल आशी प्रतिक्रिया उप सरपंच पांडुरंग कचरे यांनी व्यक्त करून त्यांनी उप कार्यकारी अभियंता सुनील राऊत व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार केला.या वेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बाळासाहेब गोडे,प्रशांत सोनवणे,सतीष धादवड,दत्तात्रय शेळके,सचिन पाटील आदी उपस्थित होते.

जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर 

Website Title: Latest News Conduct a ‘Jana Sanvad’ campaign by Mahavitaran

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here