Home अकोले राजूर प्रकल्पासमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन

राजूर प्रकल्पासमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन

राजूर: आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत अंशकालीन तसेच अथिती स्वरूपात कार्यरत असणाऱ्या क्रीडा आणि कला विषयाच्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरती करताना प्राधान्य द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी या शिक्षकांनी येथील प्रकल्प कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.

भारतीय किसान सभेचे जनरल सेक्रेटरी कॉं. डॉ. अजित नवले, कॉं. नामदेव साबळे, कॉं. नामदेव भांगरे व अखिल भारतीय किसान सभा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरु आहे.

कला, क्रीडा, शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रतेच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. अनुसूचित जमातीच्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. शासकीय आश्रम शाळेत यापूर्वी विना मानधन सेवा केलेल्या शिक्षकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी. जून २०१९ च्या भरती प्रक्रियेनुसार शिक्षकांचे पद मंजूर होईपर्यंत कंत्राटीपद्धतीने स्थानिकांना प्राधान्य द्यावे. पद मंजूर झाल्यानंतर त्यांना कायम करण्यात यावे. या व इतर मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालयाच्या गेटसमोर बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.

वाचा – संगमनेर: कंटेनर व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक

आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, कॉं. अजित नवले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.  सम्भंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र सकारात्मक मार्ग न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले आहे.    

Website Title: latest news Unrestricted agitation for various demands of teachers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here