Home अकोले डॉ. किरण लहामटे यांच्या प्रजासत्ताक जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

डॉ. किरण लहामटे यांच्या प्रजासत्ताक जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

घारगाव: सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला आमदार केले. प्रशासनाला बरोबर घेऊन मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अकोले मतदार संघाचे आमदार किरण लहामटे यांनी केले. जनसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री संगमनेर तालुक्यातील पठारभागातील लहूचा मळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुक्काम केला.

अकोले विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी २१ जानेवारीपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री क्षेत्र बाळेश्वर येथून सुरु केलेली प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा गुरुवारी घारगाव येथे पोहोचली. या जनसंवाद यात्रेला गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वाचा: संगमनेर: शिक्षकाच्या एटीममधून १० लाख लांबविणारा २४ तासांत जेरबंद

पहिल्या दिवशी पठार भागातील पिंपळगाव माथा, जवळे बाळेश्वर, महालवाडी, सावरगाव घुले, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर, वरुडी पठार, पिंपळगाव देपा, आदी गावांच्या समस्या जाणून घेतल्या. मंगळवारी सकाळी घारगाव आंबी खालसा येथे ग्रामस्थ व कार्यकार्त्यांशी संवाद साधला. गावातील समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार लहामटे यांनी समाधानकारक उत्तरे देत येत्या काळात लोकांचे प्रश्न तसेच विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. हि जनसंवाद यात्रा अकलापूर बोटा मार्गे अकोले तालुक्यात पोहोचणार असून २६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र कळसुबाई येथे सांगता होणार आहे.   

Website Title: Latest News Citizens’ Great Response to People’s Republic Travel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here