Home अकोले अकोलेत तरुणीची ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या

अकोलेत तरुणीची ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या

अकोले: अकोले तालुक्यातील कारखाना रोड येथील एका १८ वर्षीय मुलीने कौलारू घराच्या लाकडी वाशाला ओढणी बांधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारस ही घटना घडली. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला राहुल बबन जगताप यांनी खबर दिली.

बुधवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कारखाना रोड येथे राहणारी माझी पुतणी भाग्यश्री अनिल जगताप वय १८ हिने तिच्या राहत्या कौलारू घराच्या लाकडी वाशाला ओढणी बांधून गळफास घेतला. तिला औषोधप्चारासाठी ग्रामीण रुग्णालय अकोले येथे दाखल केले असता ती औषोधपचार होण्यापूर्वीच मरण पावली. या खबरीवरून अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. पुढील तपास पो.नि. अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संतोष वाघ हे करीत आहे.  

वाचा: संगमनेर: शिक्षकाच्या एटीममधून १० लाख लांबविणारा २४ तासांत जेरबंद

Website Title: Latest News Suicide committed by strangling a young girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here