Home अकोले एकदरे (जायनावाडी ) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटण.

एकदरे (जायनावाडी ) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटण.

पाडोशी (News):   आदय क्रांतीकारक राघोजी भांगरे चॅम्पीयन ट्रॉफी व भैरवनाथ क्रिकेट क्लब एकदरे (जायनावाडी ) ( ता.अकोले ) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटण पत्रकार युवा नेते सुनिल लोखंडे यांच्या हस्ते पार पडले.

या उद्घाटणाप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळु डगळे, संपत भांगरे, ग्रामसेवक भाऊसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रथम पारीतोषिक आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याकडून अकरा हजार रुपये, द्वितीय पारीतोषिक युवा नेते अमित भांगरे यांच्याकडुन सात हजार रुपये, तृतीय पारीतोषिक मारूती शेंगाळ यांच्याकडून पाच हजार रुपये, चतुर्थ पारीतोषिक कै.मारूती जाधव (सभापती,पं.स.अकोले ) हेमंत जाधव यांच्याकडुन तिन हजार रुपये आणि पाचवे पारीतोषिक बँक सेक्रटरी मुंबई सोमनाथ भांगरे यांच्याकडुन अडीच हजार रूपये अशी पारीतोषीके ठेवण्यात आली आहेत.

यावेळी संदिप भांगरे,अशोक भांगरे,संपत भांगरे,प्रविन भांगरे,बाजीराव भांगरे,सखाराम भांगरे, तुकाराम भांगरे,लालु भांगरे इत्यादी तरुण कार्यकर्ते व मंडळाचे सर्व सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

Website Title: News Ekdare tennis ball cricket competition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here