Home अकोले आदिवासी समाजभुषण पुरस्कार सोहळा संपन्न.

आदिवासी समाजभुषण पुरस्कार सोहळा संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी: कोळी महादेव समाज संघटना बदलापूर व आदिवासी विचारमंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजभूषण पुरस्कार तसेच बदलापूरभूषण पुरस्कार व क्रीडारत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यावर्षी सन 2020 चा बदलापूरभूषण पुरस्कार दत्तू आनंदा माळी यांना  प्रदान करण्यात आला.तर आदिवासी समाजभूषण पुरस्कार  बुधाजी तुकाराम डामसे यांना प्रदान करण्यात आला. तसेच आदिवासी क्रीडारत्न पुरस्कार कु.वर्षा नामदेव भवारी हिस प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला समाजसेवक शंकर असवले,वसंत पिचड, राजाराम बेंडकोळी,संजय असवले,तुकाराम निसरड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन रघुनंदन भांगे तसेच रवींद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून शंकर उंडे तसेच गोविंद मेमाणे लाभले होते.या वेळी वधुवर परिचय व गोतेभाऊ संकल्पना स्पष्ट करण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई,नगर,नाशिक,पुणे व ठाणे येथील समाजबांधव व माताभगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धर्मा लोखंडे यांनी केले. तर भारतीताई उंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Website Title: Latest News Tribal Samajbhushan Award Ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here