राजूर पोलिसांची अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दूध गाडीवर मोठी कार्यवाही
राजूर: राजूर पोलिसांची अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दूध गाडीवर मोठी कार्यवाही.राज्यात लॉक डाऊन सुरू असताना अवैध वाहतुकी सह अनेक अवैध प्रकारच्या धद्यांवर शासनाने निर्बंध घातले असून मात्र एकीकडे चक्क दूध वाहतूक गाडीतच ठाणे-मुंबईवरून प्रवासी वाढीव भाडे आकारून राजूर परिसरात भयानक जीवावर बेतणारा प्रसंग पहावयास मिळाला.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दूध वाहतूक करणाऱ्या गाडीवर राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण थोरात हे करडी नजर ठेवुन होते.त्यांना दूध गाडीमध्ये प्रवासी येत असल्याची भनक आज सकाळी लागली अछडासता नशीब खराब त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या त्या दूध गाडीसह चालक व प्रवासी यांना ताब्यात घेतले.
दुधाच्या या गोरख धंद्या माघे वेगळेच सत्र सुरू असल्याने व हा इसम चक्क आदिवासींच्या मुळावर उठल्याचे चित्र विचित्र राजूर परिसरातील डांग भागात पहावयास मिळाले.मात्र या गोरख धंद्याचे बिगुल राजूर पोलीस व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण थोरात, मनोहर मोरे चालक पांडुरंग पटेकर व आर.एस.पी.चे अधिकारी संतोष धिंदळे यांनी वाजवले,शेवटी दूध व्यावसायामागच्या काळ्या कारस्थानाचे बिगुल प्रवीण थोरात यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याचा छडा लावत चालक व प्रवासी यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर राजूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली चालक रवींद्र बर्वे व अविनाश किसन आवारी यांच्यावर भा.द.वी.कलम 188,269,270,34 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब),साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे 2 च्या अनुषंगाने स्थापीत केलेल्या महाराष्ट्र कोवीईड 19 उपाययोजना 2020 चे नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करत यांची राजूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना होमकरोन टाईन करून कुठलेही सिमटन्स तपासणी दरम्यान सापडले नाहीत.
Website Title: Latest News Rajur police action milk tempo