बिबट्याचा तरुणावर हल्ला, तरुणाने दहा मिनिटांच्या झुंजीत बिबट्याला केले नामोहरम
अकोले: अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील चितळवेढे येथे बिबट्याने तरुणावर हल्ला करत जोरदार प्रतिकार केला मात्र या तरुणाने त्याला तेवढ्याच गतीने प्रतिकार करत जोरदार काही का ळ दोघांची झुंज चालत असताना अखेर बिबट्याला या तरुणाने आपला हिसका दाखवाला हा बिबट्या काही क्षणात प्रसार झाला
सविस्तर वृत्त असे की अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे समीर अशोक आरोटे वय २१ हा आपल्या शेतामध्ये टोमॅटोला पाणी भरत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक समीर आरोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला मात्र समीर आरोटे यांनी देखील तेवढाच प्रतिकार बिबट्या बरोबर झुंज केलात त्यांनी बिबट्याला नमोहरण करत काही क्षणात बिबट्याने तिथून पळ काढला या तरुणाच्या अंगावर बिबट्याची नख ओरखडे आहेत या भागांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असून रात्रीच्या वेळी शेतकरी शेतीमध्ये पाणी भरत असताना अनेक बिबट्या पाहावयास मिळत आहेत या भागांमध्ये तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांचे केले आहे यामध्ये चितळी गावांमध्ये सर्व शेतकरी आता आपल्या घरामध्ये राहून लोकांचा नियम पाळत असताना सायंकाळी आपल्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी अनेक शेतकरी वर्ग जात असतो या भागांमध्ये रानडुकरांचा उपद्रव सुरू असून त्यामुळे बिबट्यांचा देखील मोठा उपद्रव या ठिकाणी पाहावयास मिळतो अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली तरीदेखील कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाही काल असाच मोठा प्रसंग काळ आला होता पण वेळ आली नव्हती समीरा आरोटे या तरुणाने त्याबरोबर झुंज देत आपला जीव वाचविला राजूर वन विभागाला याबाबत शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करून दुसऱ्या दिवशी नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात येणार असून वन वभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन राजुर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जाधव यांनी बोलताना सांगितले.
Website Title: News Bibtya attacked young man