Home अकोले अकोले: मामासह त्यांच्या २ भाच्यांचा नदीत बुडून मृत्यू

अकोले: मामासह त्यांच्या २ भाच्यांचा नदीत बुडून मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपत्रात पोहोण्यासाठी गेलेल्या मामासह दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ एप्रिल पाच वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चास पिंपळदरी गावात शोककळा पसरली आहे. सुनील तुकाराम वाडेकर (वय-४० रा. चास), प्रवीण दत्तात्रय फापाळे (वय-३२ रा. पिंपळदरी) व सचिन दत्तात्रय फापाळे (वय-३६ रा. पिंपळदरी) अशी मयातांची नावे आहेत. मामा हे शिक्षक होते. तर दोन्ही भाचे हे आय.टी. इंजिनीअर होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे जण चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी रविवारी चारच्या सुमारास गेले असता त्यावेळी प्रवीण फापाळे व सचिन फापाळे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. काही क्षणाचा विलंब न लावता त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मामा सुनील वाडेकर यांनी प्रयत्न केला. मात्र तिघांचाही बुडून मृत्यू झाला. मयत शिक्षक सुनील वाडेकर आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक होते. तर त्यांचे भाचे आयटी इंजिनिअर होते. या दुदैवी घटनेमुळे चास आणि पिंपळदरी गावांवर शोककळा पसरली असून  परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Website Title: Latest News uncle, were drowned in the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here