Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चार चाकी वाहनाचा टायर फुटून अपघात, सहा जखमी

संगमनेर तालुक्यात चार चाकी वाहनाचा टायर फुटून अपघात, सहा जखमी

संगमनेर: संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात गरजूंना जेवणाची पाकिटे घेऊन जात असताना चार चाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोल्हार घोटी राज्यमहामार्गावर समनापूर मंदिर ते कोल्हेवाडी फाटा या दरम्यान घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

संगमनेर बसस्थानकासमोरील गुरुद्वारा येथे गरजूंसाठी जेवण बनविण्यात येते. त्यानंतर ही जेवणाची पाकिटे गरजूंसाठी ग्रामीण भागात पोहोच केली जातात. काल संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर व निळवंडे परिसरात गरजुंना जेवणाची पाकिटे देण्यासाठी सहा जण हे चारचाकी वाहनातून चालले होते. कोल्हार घोटी राज्य मार्गावर समनापुर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान गाडीचे मागील दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.  

या अपघातात नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०), बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), , इंद्रजीतसिंग सुभाष बत्रा (वय ३६), शिवकुमार मनोजकुमार कालडा (वय २७) सौरभ अरविंद पापडेजा (वय २८), सागर जयमोहन जनवेजा (वय ३८) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

वाचा:  संगमनेर न्यूज 

Website Title: Latest news Sangamner Accident of four-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here