Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक करोना पॉझिटिव्ह आकडा २८ वर
Coronavirus:/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक नेवासा तालुक्यात करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर लोकांना तपासणीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे.
सदर व्यक्ती ही ५० वर्षीय असून नेवासा तालुक्यातील आहे. त्याला सर्दी, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाने पुण्यातील लष्करी महाविद्यालयाकडे स्त्राव नमुन्यांपैकी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिनांक ११ एप्रिलला त्याचे स्त्राव पुण्याला पाठविण्यात आले होते. तो अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे हा व्यक्ती करोनाबाधित असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
जिल्हा रुग्णालयाने आज सोमवारी सकाळी ११२३ व्यक्तीचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १०१६ अहवाल निगेटिव्ह आले आहे. अजून १३ अहवालाची प्रतीक्षा आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण २८ करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar patient positive total of 28