Home अकोले अकोले: समुह गीतगायन स्पर्धेत मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलने पटकविला स्मृतीचषक

अकोले: समुह गीतगायन स्पर्धेत मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलने पटकविला स्मृतीचषक

राजूर: सत्यानिकेतन संस्थेने आयोजित केलेल्या कै. बापूसाहेब शेंडे आंतरविद्यालयीन समुह गीतगायन स्पर्धेचा स्मृतीचषक मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलने पटकविला.

मागील सहा वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अकोले तालुक्यातील विविध विद्यालयातील १५ समुह स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यात मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलने प्रथम क्रमांक मिळवत स्मृतीचषक आपल्या नावे केला आहे. या विद्यार्थ्यांना इंद्रभान कोल्हाळ या शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले आहे. अकोले येथील मॉडर्न हायस्कूलने दुसरा क्रमांक मिळविला तर राजूर येथील गु. रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिरने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, अगस्ती विद्यालय माजी प्राचार्य रोकडे सर, संस्थेचे सहसचिव मिलिंदजी उमराणी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संतोष ठुबे म्हणाले की, कोणत्याही स्पर्धेत बक्षिसे हे महत्वाचे नसून आपला सहभाग महत्वाचा आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव मिलिंदजी उमराणी होते. संचालक व्ही. टी. पाबळकर, विजय पवार, अशोक मंडलिक, माजी प्राचार्य एम. के. बारेकर, प्राचार्य मनोहर लेंडे, उप प्राचार्य एल.पी. पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे,  रामजी काठे, टिभे मॅडम, बी.एन.ताजने, पत्रकार अजित गुंजाळ, ललित मुतडक आदी यावेळी उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख किशोर देशमुख, बाळासाहेब घिगे, सदाशिव गिरी यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. परीक्षक म्हणून शाहीर रेवणनाथ देशमुख व लोकशाहीर कैलास अटक यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन डी. बी. पगारे यांनी केले तर आभार बी. एस. घिगे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विकास जोरवर, एस. एन. वाकचौरे, आर.पी. आढळ, आर.पी. पांडे, आर.आर.मढवई, बी. व्ही. सावंत, स्मिता हासे, अविज्ञा चासकर व सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची मोलाची कामगिरी लाभली.

Website Title: Latest News Satyaniketan Rajur Group Singing Competition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here