Home अकोले अकोले तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सर्वोदय विद्यालयाचे यश

अकोले तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सर्वोदय विद्यालयाचे यश

राजुर: अकोले तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नुकत्याच आय. टी. आय. मैदान अकोले येथे पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन अकोले एजुकेशन सोसायटीचे सचिव यशवंतराव आभाळे यांच्या हस्ते झाले.  

या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले.  यामध्ये 19 वर्षाखालील मुले 4 बाय 400 मी रनिंग रिले द्वितीय क्रमांक,5 किलो मी. चालणे कृष्णा भांगरे, उंच उडी दीपक मेमाणे, करण पाटील थाळी फेक, दीपाली भांगरे 200 मी. लांब उडी, तिहेरी उडी, अश्विनी सदगिर 3000 मी.400 मी. प्रथम क्रमांक, 4 बाय 400 मी. रनिंग रिले, विशाल वायल उंच उडी, वैष्णवी हेकरे गोळा फेक द्वितीय क्रमांक या सर्वानी प्रथम व द्वितीय  क्रमांक संपादन करून त्यांची जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रा. विनोद तारू, श्री. जालिदर आरोटे, श्री. भारत भोसले,   श्री. भाऊसाहेब बनकर यांनी मार्गदर्शक केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Website Title: Latest News svm rajur students success in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here