Home अकोले अकोले: मेरा बूथ सबसे मजबूत अभियान संकल्पना : आ. वैभवराव पिचड

अकोले: मेरा बूथ सबसे मजबूत अभियान संकल्पना : आ. वैभवराव पिचड

अकोले: “मेरा बूथ सबसे मजबूत ” अभियाना अंतर्गत आमदार वैभवराव पिचड यांचे संकल्पेतून मतदार अँप बाबद समशेरपूर, खिरविरा,राजूर, वारंघुशी गणातील कार्यकर्ता बैठक संपन्न झाली .   
         भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संकल्पनेनुसार “मेरा बूथ सबसे मजबूत” म्हणजे बूथ प्रमुख व पेज प्रमुख यांनी आपले बूथ मजबूत केले पाहिजे. त्यासाठी मतदारांची वर्गवारी केली पाहिजे, आपले कोण, विरोधी कोण आणि बांधावर असणारे मतदार कोण हे नीट समजले तर बांधावर असणारे मतदार आपले बाजूने वळविण्यात यश मिळवण्यासाठी पेज प्रमुख ही संकल्पना यशस्वी पणे राबवीन्यासाठीच अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांनी मोबाईल अँप विकसित केले असून त्यातील माहिती भरली तरी राष्ट्रीय अध्यक्ष यांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी मतदार अँप मध्ये आहेत ती माहिती तातडीने भरावी असे आवाहन वाकचौरे यांनी केले
        यावेळी भाजप संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, पंस सदस्य दत्ता देशमुख, राजूर चे उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच काशिनाथ भडांगे, संतोष बनसोडे, भाजप राजूर अध्यक्ष राजेंद्र लहामगे, दलित आघाडी अध्यक्ष सुरेश पवार, मवेशी गण प्रमुख राजाराम राऊत, समशेरपूर माजी पंस सदस्य राहुल बेनके, सुभाष बेनके, यावेळी बारी चे सरपंच तुकाराम खाडे, भाऊराव उघडे, ज्ञानेश्वर झडे, विलास बांडे, दत्तू ढगे, बंटी ढगे , वृषभ भांगरे,  आदी उपस्थित होते.रामा पथवे, काळू भांगरे, बाळासाहेब लहामगे उपस्थित होते.
Website Title: Latest News akole Mera booth sabase majbut concept

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here